Friday, April 4, 2025
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेना नेते अमर परमेश्वर यांचा वाढदिवस साजरा

शिवसेना नेते अमर परमेश्वर यांचा वाढदिवस साजरा

तुळजापूर दि 18 प्रतिनिधी शिवसेनेचे तडफदार नेते अमर कदम परमेश्वर यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात तुळजापुरात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल खोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कदम परिवार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यानिमित्ताने राजकीय क्षेत्रातील विशेषता शिवसेनेतील विविध पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन केले त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू म्हणून त्यांनी अनेक वर्ष शिवसेना आणि मनसे या पक्षामध्ये काम केले. या प्रदीर्घ मनसेतील कारकिर्दी नंतर नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना शिंदे गटांमध्ये त्यांनी नुकताच प्रवेश केला पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला त्यानंतर झालेला हा पहिला वाढदिवस असल्यामुळे या वाढदिवसाला विशेष महत्त्व होते धाराशिव जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष धीरज पाटील यांनी याप्रसंगी त्यांना पुष्पहार घालून सत्कार केला तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील आणि इतर पुजारी बांधवांनी त्यांचा याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. आगामी काळात शिवसेनेच्या वेगवेगळ्या होणाऱ्या कामकाजामध्ये त्यांचा निश्चित सहभाग असणार आहे कारण जमीन पातळीवर काम करणारा कार्यकर्ता शिवसैनिक अशी त्यांची पूर्वीपासून ओळख आहे स्थानिक राजकारणामध्ये अनेक वर्षापासून सक्रिय राहिल्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी आहे तालुक्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये देखील त्यांचा वावर आहे त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाच्या शिवसेना पक्षामध्ये त्यांच्यावर चांगली जबाबदारी घेण्याची अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे

१७-०४-२०२३ रोजी जगदंबा निवास येथे माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात माझ्या मित्र व कदम बंधू परिवारांकडून साजरा साजरा करण्यात आला.यावेळी धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते अनिल खोचरे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धिरज पाटील,माजी नगराध्यक्ष संतोष कदम,माजी नगराध्यक्ष अजित कदम,माजी नगरसेवक संजय कदम, माजी नगरसेवक सचिन बुबासाहेब पाटील,तुळजापूर विधी बार एसोसिएशनचे अध्यक्ष विधिज्ञ संजय पवार,तुळजापूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय खुरूद,माजी नगरसेवक दयानंद हिबारे,
अतुल भैय्या मलबा,सचिन परमेश्वर,राजेंद्र कदम,
विधिज्ञ दादासाहेब सोंजी,प्रशांत सोंजी,समाधान परमेश्वर,प्रशांत पाटील,राजाभाऊ मलबा,विकास मलबा,पृथ्वीराज मलबा,तुषार कदम, स्वराज कदम,अविराज मलबा, सार्थक मलबा,अक्षय परमेश्वर,रोहित कदम,संदिप कदम,महेश चोपदार,नितीन परमेश्वर,काकासाहेब शिंदे,विष्णू दळवी सर,राहुल बचाटेसर,मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव,धर्मराज सावंत,उमेश कांबळे,
शिवाजी परमेश्वर,महेश परमेश्वर,अनुप उदाजी,
निलेश परमेश्वर,धनंजय पाटील,सुरज कोठावळे,
खंडू कुंभार,झुंबर काळदाते,आदी शुभचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने हजर होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!