Friday, April 4, 2025
Homeब्रेकिंग न्यूजआध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर 2 फेब्रुवारी रोजी तुळजापुरात

आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर 2 फेब्रुवारी रोजी तुळजापुरात

तुळजापूर दिनांक 16 प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर गुरुजी 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या नगरीत जागर भक्तीचा हा सत्संग कार्यक्रम करण्यासाठी येत आहेत या कार्यक्रमासाठी परिसरातील 50 हजार लोक उपस्थित राहतील अशी माहिती तुळजापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे अपेक्स मेंबर नंदकिशोर आवटी व मराठवाडा समन्वयक मकरंद जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर नगरीमध्ये 2 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जागर भक्तीचा या सत्संगासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर सायंकाळी पाच वाजता तुळजापुरात येणार आहेत सहा वाजता त्यांचा जाहीर जागर भक्तीचा हा सत्संग येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर होत आहे यासाठी लातूर उस्मानाबाद सोलापूर या जिल्ह्यामधून 50 हजार नागरिक उपस्थित राहतील असे सांगण्यात आले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आर्ट ऑफ लिविंग चे पदाधिकारी व प्रशिक्षक देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने अपेक्स पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक लक्ष्मण भंडारी, विभाग समन्वयक डॉ. उदय मोरे, प्रशिक्षक डॉ. जितेंद्र कानडे, प्रशांत संगपाल, डॉ. राहुल पाटील, शशिकांत परमेश्वर, सचिन सूर्यवंशी, राजू देशमुख आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर होते. सर्वश्री नागेश नाईक, सचिन जाधव, विजय भगरे संजय मांजरगी प्रवीण मैंदर्गी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

2  फेब्रुवारी रोजी सत्संग झाल्यानंतर श्री श्री रविशंकर मान्यवरांशी भोजनोत्तर चर्चा करणार आहेत त्यांचा मुक्काम तुळजापूर येथे असून दुसऱ्या दिवशी सकाळी 3 फेब्रुवारी रोजी ते तुळजाभवानी देवीचे दर्शन घेणार आहेत महाराष्ट्रामध्ये यावर्षी श्री श्री रविशंकर यांचे एकूण 11 कार्यक्रम होत असून कोल्हापूर पासून त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे त्यानंतर नांदेड वाटुर येथून ते तुळजापूर येथे येणार आहेत तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर ते शिखर शिंगणापूर कडे रवाना होणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये प्रारंभी प्रास्ताविक डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!