Friday, April 4, 2025
Homeब्रेकिंग न्यूजस्पर्धा परीक्षेमधून जवळगा मेसाईने मिळवलेले यश जिल्ह्यासाठी प्रेरणादायी

स्पर्धा परीक्षेमधून जवळगा मेसाईने मिळवलेले यश जिल्ह्यासाठी प्रेरणादायी

ग्रामीण भागात कसलेली गुणवत्ता –  माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण 

तुळजापूर दि  11 डॉ सतीश महामुनी

 जवळगा मेसाई गावाने गुणवत्तेमध्य व उच्च शिक्षणामध्ये घेतलेली आघाडी संपूर्ण जिल्ह्यासाठी अनुकरणीय आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत धाडसाने पुढे याव असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. 

यावेळी व्यासपीठावर पं. स. माजी उपसभापती साधू मुळे, किलजचे सरपंच लक्ष्मण तात्या शिंदे, वडगाव देवचे माजी सरपंच देवकते गुरुजी, माजी जि प सदस्य बालाजी बंडगर, प्रभाकर मुळे, करीम अंसारी, जवळगा मे चे सरपंच नवनाथ जगताप, विद्यासागर लोखंडे, रणवीर चव्हाण, दादासाहेब चौधरी, बाबासाहेब इंगळे, आप्पाराव लोखंडे, नवनाथ नरवडे आदी उपस्थित होते

यावेळी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की ग्रामीण भागातून अनेक तरुण स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवीत असून पुढील पिढीने त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून जिद्दीने अजित लोखंडे याने हे यश मिळवले. सत्कारमूर्ती डॉक्टर मिलिंद लोखंडे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल् गावाच्या प्रति आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.

त्याचबरोबर एमडीएस डॉ. मोनिका लोखंडे, एमबीबीएस डॉ. मिलिंद लोखंडे, ऍड शुभम कापसे, सेवानिवृत्त सैनिक दयानंद खबुले आणि भारतीय सैन्यात दाखल झालेले अक्षय वाघ यांचाही याप्रसंगी सत्कार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

 याप्रसंगी कार्यक्रमांमध्ये  वट्टे गुरुजी, श्रीहरी लोखंडे बालाजी जगताप, शाहूराज लोखंडे, लक्ष्मण इंगळे, संभाजी मुळे, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!