Saturday, April 5, 2025
Homeब्रेकिंग न्यूजशंकरराव जावळे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शेषराव जावळे यांची निवड 

शंकरराव जावळे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शेषराव जावळे यांची निवड 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथे इलेक्ट्रॉनिक्स विभाग म्हणून होते कार्यरत

तुळजापूर दिनांक 11 डॉ सतीश महामुनी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  छत्रपती संभाजीनगर संलग्नित भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था लोहारा, शंकरराव जावळे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्य पदाचा पदभार प्रा.डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी 11 एप्रिल मराठी 2023 रोजी स्वीकारला.  तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे ते यापूर्वी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.

महाविद्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नूतन प्राचार्य प्रा. डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी त्यांनी संस्थेची आणि महाविद्यालयाच्या पूर्वापार जडण घडण व पूर्ण इतिवृतांत कर्मचाऱ्यांच्या समोर मांडला.खास करून कै. आ. वसंतराव काळे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे सचिव व प्राचार्य या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा होता असे सांगितले.

याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील उपस्थित होते. प्र. प्राचार्य प्रा.डॉ.विनायक पाटील यांनी मनोगत व्यक्त करून नूतन प्राचार्य यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्यासह प्रा डॉ सुर्यवंशी आर एम, प्रा डॉ एस एस कदम, प्रा मोटे बी बी, प्रा डॉ सोनवणे, प्रा डॉ कडेकर सी जी, प्रा डॉ माने पी व्ही , प्रा नितिन आष्टेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. एस एस कदम यांनी, तर आभाप्रदर्शन प्रा डॉ गायकवाड पी के यांनी केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यावर त्यांनी अनेक वर्ष सिनेट सदस्य म्हणून काम केले आहे मराठवाड्यातल्या शिक्षण क्षेत्राच्या अनुषंगाने त्यांनी प्रदीर्घकाळ कामकाज केलेले आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगला वावर आहे मूळ लोहारा तालुक्यातील रहिवासी असल्यामुळे शंकराव पाटील महाविद्यालयासाठी आगामी काळात त्यांचे योगदान महत्त्वाचे आणि मोलाचे असणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!