Saturday, April 5, 2025
Homeब्रेकिंग न्यूजहिंदू गर्जना ढोल पथकाच्या वतीने शिवजयंती निमित्त तुळजापुरात जोरदार मिरवणूक

हिंदू गर्जना ढोल पथकाच्या वतीने शिवजयंती निमित्त तुळजापुरात जोरदार मिरवणूक

तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी. तुळजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हिंदू गर्जना ढोल पथकाच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गावरून शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर मिरवणूक निघाली असून या मिरवणुकीमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हिंदू गर्जना संघटनेच्या वतीने अत्यंत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ढोल पथकाच्या वतीने मिरवणुकीला सुरुवात झाली. हिंदू गर्जनेचे प्रमुख एडवोकेट गिरीश लोहारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन संपन्न झाले. जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून निघाला.

त्यानंतर भगवे फेटे बांधून तरुण आणि तरुणी यांनी ढोल आपल्या कमरेभोवती बांधले आणि गगनभेदी आवाज करीत ढोल वाजण्यास सुरुवात झाली. याप्रसंगी पुन्हा जय भवानी जय शिवाजी चा जयघोष करण्यात आला अत्यंत उत्साहात आणि जयजयकार करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीमध्ये शहरातील तरुण-तरुणी आणि मान्यवर यांचा सहभाग असून ही मिरवणूक तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर आली तेव्हा विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांना ढोल वाजवण्या पासून दूर राहता आले नाही त्यांनी कमरेला ढोल बाजे आणि ढोल वाजवायला सुरुवात झाली पोलीस विभागीय अधिकारी सई मोरे पाटील यांनी हिंदू गर्जना ढोल पथकाच्या सोबत ढोल वाजवला तेव्हा उपस्थित हजारो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा दिल्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही मिरवणूक महाद्वार चौकापासून पुढे चालली आहे.

हिंदू गर्जना ढोल पथकाची ही मिरवणूक तुळजापूर शहरातील शिवजयंती उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरली रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी ढोल पथकाचा ढोल वाजणार चा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!