Saturday, April 5, 2025
Homeब्रेकिंग न्यूजशिवरायांचे विचार आचरणात आणावेत - विनोद गंगणे यांच्या आवाहन

शिवरायांचे विचार आचरणात आणावेत – विनोद गंगणे यांच्या आवाहन

तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी तमाम नागरिकांना उद्देशून सोशल मीडिया पोस्ट प्रसारित केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम देशवासी यांचे आराध्य दैवत आहे हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाजाच्या सर्व स्तरात आज पूजन होत आहे या निमित्ताने मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणवैशिष्ट्ये अंगीकारावीत व त्याप्रमाणे आचरण करावे.

तुळजापूरच्या राजकारणातील प्रमुख सूत्रधार किंग मेकर म्हणून मागील पंधरा वर्षापासून विनोद गंगणे सक्रिय आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा देताना असे म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगणे तसेच विचार ऐकणे छत्रपती शिवरायांचा जयघोष करणे हे जेवढे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर शिवरायांच्या विचाराने आचरण करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आणि जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार स्वतः आचरणामध्ये आणतो तोच व्यक्ती जगावर राज्य करू शकतो. आपण ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहात तेथे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून आपले योगदान द्यावे म्हणजे खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होणार आहे. गरजू लोकांसाठी दररोज शिवजयंती साजरी करण्यासारखे पुण्य यामधून प्राप्त होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर माजी नगराध्यक्ष सौ अर्चनाताई गंगणे व माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी केलेल्या पोस्टमध्ये आपल्या सोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते तसेच सर्व तुळजापूर तालुक्यातील जनतेला आपण या निमित्ताने शुभेच्छा देत आहोत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!