Saturday, April 5, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने वाचनालयाची सुरुवात

राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने वाचनालयाची सुरुवात

तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी

राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून जिथे वृक्षारोपण केले. विभागीय पोलीस अधिकारी सई भोर पाटील यांच्या शुभहस्ते भगव्या ध्वज रोहन करण्यात आले. मैदानावर ज्येष्ठ नागरिकांना आणि फिरण्यासाठी आलेल्या महिला तरुणांना बसण्यासाठी राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब च्या वतीने बेंचेस असून तेथे लोकांना वाचण्याचे गोडी लागावी तसेच नव्या पिढीला वृत्तपत्रे व इतर साहित्य वाचण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दोन वाचनालय सुरू करण्यात आली आहेत.

मैदानावर फिरण्यासाठी आलेले लोक मोबाईल बघत बसतात मोबाईलच्या आहारी गेलेल्या समाजाला जागृत करण्याच्या साठी हा राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब व खेळाडूंनी सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे .

या अनुषंगाने वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी क्लब तर्फे दोन शाखा वाचणाऱ्याच्या चालू केल्या याचा उद्घाटन विभागीय पोलीस अधिकारी सई भोर पाटील यांनी केली यावेळी उपस्थिती रवी भागवत, विठ्ठल चासकर साहेब, विपिन शिंदे, नितीन सूर्यवंशी, बबलू सरवदे, ऋषिकेश साळुंखे, अमर गायकवाड, धनंजय सावंत, सिद्धी राज कदम, शुभम जगताप, प्रणव मलबा, सचिन शिंदे, प्रसाद पेंदे, बांगर साहे इत्यादी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळजापूर शहरांमध्ये राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब सातत्याने वर्षभरात वेगवेगळे समाज उपयोगी आणि लोकांना आवडणारे उपक्रम राबवितात वृक्षारोपण आणि इतर कामांमध्ये या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे या उपक्रमाबद्दल त्यांचे तुळजापूर शहरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या या उपक्रमाचे येथील पत्रकार डॉ. सतीश महामुनी यांनी स्वागत केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!